उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील दहिफळ येथील मुस्लिम समाजातील इस्माईल शेख हे गेल्या 35 वर्षांपासून शारदीय नवरात्र महोत्सवात सहभागी होऊन देवीची पूजा करतात. सर्व धार्मिक विधी पार पाडतात. दररोज देवीला साडी नेसवतात. त्याबद्दल त्यांच्या सेवेचे कौतुक करुन माजी जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी मंगळवारी (दि.27) दहिफळ येथे जावून त्यांना सेवा गौरव पुरस्कार देवून सन्मान केला.

यावेळी बोलताना संजय पाटील यांनी राजकारण जाती पातीवर करणार्‍या पुढार्‍याला झणझणीत अंजन घालणारा हा प्रसंग आहे. जाती धर्माच्या पुढे माणुसकीचे दर्शन येथे घडते आहे. एका हिंदू सणाला पुढाकार घेणारा अध्यक्ष म्हणून चांगली सेवा करणारा व्यक्ती इस्माईल शेख खरच आदर्श घ्यावा असा आहे, असे गौरवोद्गार काढले. यावेळी तात्या भातलवंडे, कृष्णा पाटील, फुलचंद काकडे, योगराज पांचाळ, नारायण भातलवंडे, श्रीकांत काकडे, खंडु भातलवंडे, सज्जन कोठावळे, अंजूमन शेख, मल्हारी लाटे, संजय मते, रंजीत काकडे, सुसेन पाटील, बालाजी ढवळे, सतिश मते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 
Top