उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील        शिवशंभुपंढरी वसाहत  आई लॉन्स जवळील शामराव दहिटणकर यांच्या निवासस्थानच्या सत्संग सभागृहामध्ये ज्ञानेश्वरी जयंती साजरी झाली प्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजनासह ध्येय मंत्र पठणानंतर श्री ज्ञानेश्वर माऊली व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे झरेगाव दत्त संस्थान हभप काका महाराज आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सरचिटणीस तथा मा. नगरसेविका सौ.प्रेमाताई सुधीर पाटील, कुमार व्यास , शामराव दहिटणकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. 

प्रास्ताविकात शामराव दहिटणकर म्हणाले एकनाथ महाराजांनी शके १५०६ म्हणजे आजच्या दिवशी ४३८ वर्षांपूर्वी भाद्रपद वद्य षष्ठी ला ज्ञानेश्वरी ग्रंथ शुद्ध केला कालौघात काही शब्द ओव्या त्यात घालून काही दोष निर्माण झाले ते माऊलीच्या स्वप्नदृष्टांतानुसार शुद्ध करण्याचे काम त्यांनी हाती घेऊन त्यांच्याच कृपेने कपिला षष्ठीच्या दिवशी लेखन पूर्ण केले त्याची स्मृती जागवणे कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला यावर्षी ७२५ वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात व जग भरात  ज्या ठिकाणी मराठी भाषीक आहेत असे सुमारे ५० हजार भाविक ज्ञानेश्वरीचे लेखन करत आहेत धाराशिव शहर व परिसरात ३०० पेक्षा जास्त भाविक लेखन करीत आहेत. याप्रसंगी डॉक्टर पल्लवी शतानंद दहिटणकर यांनी ज्ञानेश्वरी लिखाण आजच पूर्ण केले त्याबद्दल त्यांच्या सासूबाई सौ सुनीता शामराव दहिटणकर  या प्रसंगी दोघींनी एकमेकास पुष्पहार घालून सत्कार क ख्यात आला याप्रसंगी ज्ञानेश्वरी नित्य पाठाचे वाचन ह भ प कुमार व्यास यांचे प्रवचन झाले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमासाठी बंडूपंत प्रयाग ,प्रा. सुधाकर कुलकर्णी, सौ. सुदर्शना शेषनाथ वाघ ,विजय पटवारी, चि.सत्यहरी वाघ ,चि. अनघ दहिटणकर  महिला भगिनी उपस्थित होत्या .

 
Top