उस्मानाबाद / प्रतिनिधी-

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (नॅशनल गेम्स) साठी उस्मानाबाद च्या पाच खेळाडूंसह, मुख्य प्रशिक्षकपदी श्री प्रविण बागल यांची  निवड झाली आहे.

     36 व्या  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (नॅशनल गेम्स) अहमदाबाद, गुजरात येथे दि 29 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर 2022  मध्ये सम्पन्न होत आहेत.या स्पर्धेसाठी पुरुष व महिला महाराष्ट्र खो खो संघाची  बालेवाडी पुणे येथे निवडचाचणी घेण्यात आली होती.

   या निवडचाचणीतून महाराष्ट्र खो खो संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र खो खो महिला संघात उस्मानाबाद येथील कु ऋतुजा खरे, कु.गौरी शिंदे, कु. संपदा मोरे,कु.जान्हवी पेठे या चार मुलींचा तर पुरुषच्या संघात कु. विजय शिंदे  अश्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र खो खो संघात वर्णी लागली आहे.त्यातच गौरवाची बाब म्हणजे राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक व श्रीपतराव भोसले हायस्कूल चे क्रीडाशिक्षक श्री प्रविण बागल सर यांची महाराष्ट्र महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळण्यास महाराष्ट्र खो खो असोसिएशन ने निवड केली आहे. 

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर दि 14 सप्टेंबर रोजी आहे. 

 
Top