तुळजापूर / प्रतिनिधी-

  श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या श्रीगणेश मुर्तीची अनंत चतुर्थीच्या  दिनी शुक्रवारी  राञी   छबिना समोर  मिरवणूक काढुन श्रीकल्लोळ तिर्थकुंडात  विसर्जन करण्यात आले.

 तुळजापूर शहरासह परिसरात शुक्रवार दि.९रोजी अनंतचतुर्थी दिनी दुपार नंतर  धुवादार पाऊस सुरु  झाला तो सांयकाळ पर्यंत  होता. या पावसात घरगुती व सार्वजनिक   गणेश मंडळाने मुर्ती ची अखेरची आरती करुन लातुर रोडवर असणाऱ्या पाचुंदा तलावात विसर्जन केले.

  दयावान युवा मंचाच्या मुर्ती चे क्रेनन विसर्जन !

शहरातील सर्वात उंच  गणेश मुर्ती असलेल्या दयावान युवा मंचाच्या वीस फुट  गणेशाच्या मुर्तीचे पुजन आनंद कंदले यांच्या हस्ते करण्यात येवुन  क्रेन मदतीने  विसर्जन पाचुंदा तलावात करण्यात आले.

 
Top