तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे - ऐन सणासुदी काळात उडीदाला शनिवार दि.१०रोजी ७६००रुपये असा विक्रमी भाव आला असल्याने शेतकरी बांधवांनी वाळवून स्वच्छ केलेला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन सचिव उमेश भोपळे यांनी केले आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळत असुन यंदा शनिवारी उडीदाला ७६०० रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे.

शासन हमीभाव उडीदाला ६६०० रुपये तरी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपला शेतमाल  स्वच्छ करुन  वाळवून उडीदासह अन्य शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर येथे विक्रीस आणण्याचे, आवाहन सचिव उमेश भोपळे यांनी केले आहे.

 
Top