तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यात दोन ते तीन दिवसापासून दररोज मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढे, नाले भरभरून वाहत असुन शुक्रवारी  झालेल्या जोरदार पावसाने बारुळ येथील बोरी येथील ओढ्यात प्रचंड पाणी आले होतेया दरम्यान   सांयकाळी 6 वाजता  एक व्यक्ती मोटार सायकल घेवुन जाताना   वाहून जाताना  गावकऱ्यांनी  त्यास  लगेच बाहेर काढले परंतु यात त्यांची  मोटारसायकल वाहून गेली.

   सध्या शारदीय नवरात्र महोत्सव सुरु असल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात वाहतूक मार्गात बदल केल्याने मोठ्या प्रमाणात तुळजापूर हुन नळदुर्ग,  उमरगा,  हैद्राबादला जाणारी वाहतूक वळवली जात असते,  त्याच बरोबर लातूर नळदुर्ग रस्ता जोडणार हा महत्वाचा पूल असल्याने याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून ग्रामपंचायत ने अनेक वेळा संबंधित विभागास पत्र व्यवहार केला आहे. परंतु या याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. तरी याबाबत जिल्हाधिकारी  यांनी लक्ष घालावे अशी मागणी गावकऱ्या मधून होतं आहे


 
Top