मोठ्या प्रतीक्षेनंतर आज उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे. उस्मानाबाद करांसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा व अविस्मरणीय आहे, अशी माहिती अामदार राणाजगजिसिंह पाटील यांनी दिली.
 उस्मानाबाद येथील महाआरोग्य शिबीरा दरम्यान ४ मार्च २०१८ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन यांनी उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती, व आज राष्ट्रीय आयुर्वेविज्ञान संस्थेने मंजुरीचे पत्र दिले आहे. 
 उस्मानाबाद येथे याच वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे तात्काळ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन, वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव तसेच आयुक्त यांची भेट घेऊन चर्चा केली व राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेकडे फेर प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्रुटींच्या पूर्ततेसाठी वेगाने कामे केली, खुद्द आयुक्तांनी सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसोबत बसून परिपूर्ण प्रस्ताव बनवला व दिनांक ५ सप्टेंबर रोजी संस्थेच्या दिल्ली कार्यालयात फेर प्रस्ताव दाखल केला. या अनुषंगाने दिनांक १८ सप्टेंबर रोजी फेर तपासणीसाठी समिती आली व त्यांनी त्रुटींच्या पूर्ततेबाबत केलेल्या कार्यवाही वर समाधान व्यक्त करत आज झालेल्या व्हिडिओ  कॉन्फरन्सिंग मध्ये टीम उस्मानाबादचे अभिनंदन करत वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिल्याचे पत्र दिले. उस्मानाबाद करांचे अनेक दिवसाचे स्वप्न आज साकार झाल्याचा आनंद अवर्णनीय आहे. जिल्ह्यातील जनतेचे हार्दिक अभिनंदन. 

 
Top