तुळजापूर  / प्रतिनिधी-

 शहरातील हडको भागातील रहिवाशी सौ.पूनम व कुमार जाधव या दांपत्याने आपल्या घरातील गौरी गणपती समोर महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृतीचे  दर्शन घडविणारा देखावा सादर केला आहे. लोप पावत चालेली ग्रामीण संस्कृतीची जोपासना करण्यासाठी व नव्या पिढीला जुन्या रुढी परंपरा राहणीमान याची नव्यानं ओळख व्हावी या उद्देशाने हा देखावा तयार करण्यात आला आहे.

 या देखाव्यातून जुन्या काळातील अस्सल ग्रामीण संस्कृतीचा बाज अनुभवायला मिळत आहे. जत्रा, सण, घरांची मांडणी , पितळी भांडी, पारंपरिक शेती, शेतीची औजारे, बाजारहाट अशा अनेक गोष्टी या मध्ये मांडण्यात आल्या आहेत या देखाव्यासाठी त्यांची मुलं कुणाल व मानसी यांनी सहकार्य केलं आहे 

त्यांचा हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून त्यांनी साकारलेल्या या आगळ्या वेगळ्या देखाव्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top