उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

 शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाची इयत्ता ७वी च्या ४५ सहभागी विद्यार्थ्यांची एकदिवशीय सहल संपन्न झाली कोवीड १९ नंतर प्रथम भवानी संग्रहालय औंध जि.सातारा यमाई मंदीर, महादेव शिखर शिंगणापूर , अकलूज शिवसृष्टी या शैक्षणिक, धार्मिक, पर्यटन स्थळाच्या विद्यार्यांना शैक्षणिक जीवनातील सहलीच्या अनुभवासाठी एकदिवशीय सहलीचे आयोजन केले होते. कलाकारांचा आदरयुक्त राजआश्रय देणारे कलारसिक श्रीमंत बाळासाहेब पंत औंध संस्थान यांनी १८७० साली ७० हजार रु. खर्च करून जागतिक पातळीवर प्रख्यात चित्रकार जुन्या शतकातील बाबुराव पेंटर,धुरंधर,पी. सरदार अश्या दिग्गज चित्रकारांची चित्रे नवीन पिढीत उस्मानाबाद जिल्ह्यातील चित्रकार मोग्गलान श्रावस्ती महाराष्ट्रातील जी.एस.माजगावकर अथ्या चित्रकारांची चित्रे , हस्ती दंत कलाकृती शिल्पाकृती व मिनीचर चित्रे अश्या विविध संग्रही चित्रांचे संग्रह पाहुन विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण वाटले यमाईदेवी , महाराष्ट्राचे आराध्य दैवत महादेव शिखर शिंगणापूर धार्मिक दर्शना नंतर सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशाच्या निर्मित छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जीवनपट जन्म ते राज्याभिषेक अशी शौर्यगाथा  मा. मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील शिल्पकार दिपक दिनकर थोपटे यांनी साकारलेली शिल्पाकृती पाहून विद्यार्थ्यांना ऐतिहासिकदृष्ट्या माहिती मिळाली.

 या एकादिवशीय सहलीच्या नियोजनासाठी आ.शि.प्र.मं.संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील , मुख्याध्यापक साहेबराव देशमुख , उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी यांचे मार्ग दर्शन लाभले वाहन विभाग प्रमुख ऋषिकेश शिंदे चालक नितीन नाईकवाडी यांचे सहकार्य केले त्याच बरोबर अकलूज येथील कलाध्यापक बांधव संजय पवार , संदीप देशमुख, शरद भोसले यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने गोड पदार्थ देऊन भोजन नियोजनासाठी मोल्याचे सहकार्य लाभले सहल यशस्वीतेसाठी सहल विभाग प्रमुख डी .ए . देशमुख,इ.७वी पर्यवेक्षक आर.बी. जाधव कलाध्यापक शेषनाथ वाघ, सहशिक्षक डी.टी.कें गार , शिक्षिका सौ.जी.बी. मस्के.एस. सौ. एस.यु.साळवी , सौ.एस.एम.देशमाने यांनी परिश्रम घेतले एकदिवशीय सहलीचा विद्यार्थ्यांच्या आनंद उत्साहात यशस्वी संपन्न झाली

 
Top