उमरगा/प्रतिनिधी

 येथील आदर्श महाविद्यालय व समाज कल्याण विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महाविद्यालयात “ समान संधी केंद्राचे उद्घाटन राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला मुलीना शिष्यवृत्ती , फ्री शिप , इत्यादी योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजगता , व्यावसाय , रोजगार निर्मिती व्यसन मुक्ती या करीता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्या करीता प्रत्येक महाविद्यालयात “ समान संधी केंद्र “ उभारण्यात येते .येथील आदर्श महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत , समाज कल्याण निरीक्षक युवराज भोसले, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड , उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी,प्रा.बालाजी पिडगे , प्रा.डॉ. आप्पाराव गायकवाड यांची उपस्थिती होती.  महाविद्यालयाच्या वतीने डॉ. नारनवरे यांचा सत्कार करण्यात आला .समाजकल्याण आयुक्तानी विद्यार्थ्यांशी संवाद साधून समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी आदर्श महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागाचे विभाग प्रमुख सहदेव सोनकांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top