उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्वा दरम्यान पर्यावरण पुरक गणेश स्थापना, समाज प्रबोधनपर देखावे, एक गाव एक गणपती, रक्तदान शिबीर आयोजन, वृक्षारोपन, मोफत आरोग्य शिबीर आयोजन इत्यादी निकष पुर्ण करणाऱ्या गणेश मंडळांची निवड करण्यात आली होती. 

यामध्ये  किसान गणेश मंडळ, मुरुम, शहिद भगतसिंग गणेश मंडळ, कळंब, जयहनुमान गणेश मंडळ, नळदुर्ग या गणेश मंडळांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर निवड करण्यात येउन  पोलीस मुख्यालयातील सभागृहात पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते त्या गणेश मंडळांना सन्मानचिन्ह व प्रशंसापत्र देउन गौरविण्यात आले. 


 
Top