परांडा /प्रतिनिधी- 

संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी व्हावी या उद्देशाने पक्ष सभासद नोंदणी चा कार्यक्रम राज्यभर सुरु आहे. त्या अनुषंगाने परंडा भूम वाशी मतदार संघाचे आ.राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरअध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांचाक्रियाशील सभासद नोंदणी फॉर्म भरून घेऊन परंडा शहरात शुभारंभ करण्यात आला.

   यावेळी शहर अध्यक्ष वाजिद दखनी,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाअध्यक्ष राहुल बनसोडे,मा.नगरसेवक संजय घाडगे, मा. नगरसेवक राजकुमार माने आदी उपस्थित होते.


 
Top