तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील नळदुर्ग येथील अंबाबाई मंदीरात  शिवसेनेने  प्रतिज्ञा सभा घेवुन महाराष्ट्रातला प्रतीज्ञा सभेचा पहिला उपक्रम  राबवला आहे.

 बाळासाहेबांच्या कडवट शिवसेनेमधील व माजी पदाधिकऱ्यामधील ऊर्जा रुप  हा कोणी विसरू शकणार नाही त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून शिवसेना पक्ष, संघटन मजबूत करावयाचे आव्हान प्रतिज्ञा सभेत कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक अजय दासरी यांनी व्यक्त केले . कडवट शिवसैनिकाला कोणत्याही पदाची आवश्यकता नाही

 या कार्यक्रमासाठी माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर  चव्हाण, बसवराज वरनाडे, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण पाटील , सुरेश वाले, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अरुण कोळी, सोपान निघते, गुलाब बाबर,  रमेश नवले, शाहू फरताडे, बापू कोकरे , युवा सेनेचे राज्यसचिव स्वप्नील वाघमारे, अतुल राजे भवर, उपतालुकाप्रमुख प्रदीप  मगर , सरदार सिंग ठाकूर , सुनील जाधव कृष्णात मोर,  संजय देशमुख, पांडुरंग पवार,  संजय पवार,  महादेव बंडगर , सुधाकर पाटील   रज्जाक भाई सत्तार,  प्रदीप जोशी, संतोष पुदाले,  श्याम कनकधार, सोमनाथ मेहत्रे, भीमा कोळी चंदू सगरे ,   नेताजी महाबोले,   सुधीर कदम,  जय प्रकाश दरेकर, कालिदास नाईकवाडी, लोभे सर,  प्रसाद भोसले,   सुरेश ठाकर,  मुकुंद गायकवाड आदी  उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप   मगर यांनी केले

यावेळी संतोष पुदाले,  बाळकृष्ण पाटील , सरदार सिंग ठाकूर, कृष्णात मोरे, सुधीर कदम, सुरेश वाले, महादेव बंडगर , प्रदीप जोश, अतुल भवर, सुधाकर पाटील, कमराकर चव्हाण,  माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे आणि संयोजक प्राध्यापक अजय दासरी यांची मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाच्या  सुरुवातीला वंदनीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिज्ञा करण्यात आली. व शेवटी गद्दार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. कार्यक्रमास धाराशिव सोलापुरातील 150 माजी पदाधिकारी व सुमारे दोनशे कडवट शिवसैनिक उपस्थित होते. 


 
Top