उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मिशन वात्सल्य योजनेसह इतर सर्व योजनांच्या संदर्भात आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे खा.श्री.ओम राजेनिंबाळकर, आमदार श्री.कैलास घाडगे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्हाधिकारी श्री.कौस्तूभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहूल गुप्ता यांच्यासह संबंधीत अधिकाऱ्यांच्या समवेत पार पडली.

 या आढावा बैठकीमध्ये प्राधान्याने कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची  कुटुंबे व शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबाच्या बाबतीत राज्याच्या योजनांचा आढावा घेतला. कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक कुटुंबे कुटुंबकर्त्याच्या अकाली मृत्युमुळे आर्थिक संकटाचा सामना करत असताना त्यांना आधार देणेकरीता महाराष्ट्र शासनातर्फे ५०००० रु. अनुदान एकल महिलांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र महिलांना अनुदान देणेकरिता आढावा घेण्यात आला. तसेच संबंधितांना अनुदान अदा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. यामुळे कोरोनामध्ये मृत्यु पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळणार आहे याच बरोबर बाल संगोपन योजना, बाल न्याय निधी, वारसा प्रमाणपत्र योजना, एकल महिलांसाठी जिल्हा उद्योग केंद्रातील योजना, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धपकाळ अशा विविध निराधार योजनांचा आढावा घेतला.

  कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन राबवून योजनेस पात्र लाभार्थी महिलांची निवड करावी, ज्या लाभार्थींना विमा पॉलिसी चा लाभ मिळाला नाही यांची माहिती मागवून त्याची यादी विमा कंपनीला देण्यात यावी, कृषी विभागाच्या योजना राबवण्यास प्राधान्य द्यावे, जन्म मृत्यु दाखला तात्काळ द्यावेत, जातीचे प्रमाणपत्र तात्काळ द्यावे, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना लाभार्थी राहू नये, अनाथ बालकांना शाळेमध्ये प्रवेश मिळालेले आहेत का याची माहिती घ्यावी तसेच अनाथ बालकांची शालेय फी माफ झाली का, त्यांना घरकुल मिळालेत का, कौशल्य विकास कार्यक्रम राबवुन त्यांना प्राधान्याने उद्योग क्षेत्रात आणावे, सर्वांना अंत्योदय योजनेत सहभागी करून घ्यावे अशा अनेक बाबीवर सविस्तर चर्चा करून संबंधितांना योजनेच्या कामांबाबत परिपुर्णता ठेवण्याबाबत सुचना दिल्या.  जिल्हा उद्योग केंद्र, धाराशिव येथील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून उमरगा येथे ३० महिलांच्या दोन गटांसाठी व्यवसाय प्रशिक्षण सुरु केले असून पुढील गट लवकरच तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. याचा फायदा एकल महिलांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी व आर्थिक निर्भर होण्याकरता होणार असल्याचे जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्रमूखांनी बैठकीदरम्यान दिले. तसेच इलेक्ट्रीक शॉक लागून शेतकऱ्यांची अनेक जनांवरे दगावली असून या जनावरांचा मोबदला लवकरात लवकर देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. तसेच आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेचे कार्ड वितरण करताना प्रथमत: एकल महिलांना प्राधान्य देण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी निवासी जिल्हाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल विकास अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, एकल महिला समितीचे तसेच उस्मानाबाद जिल्हा समन्वयक कोरोना समितीचे विजय काका जाधव, उमरगा तालुका समन्वयक विजय तळभोगे, उमरगा तालुका सचिव इस्माईल शेख यांच्यासह संबंधीत पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top