तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती ज्या  मुख्यगृर्भ गृहातील चांदीच्या सिंहासनात अधिष्ठीत केली जाते  ते  चांदीचे  सिंहासन पुणे येथील भाविक प्रवेश कैलास पेटकर यांनी  स्वच्छ करुन  चकचकीत केले आहे.

 श्रीतुळजाभवानी मातेचे मुख्यगृर्भतील चांदीचे सिंहासन बरोबरच चांदीचा  चोपदार दरवजा, सिंह गाभाऱ्यातील चांदीचा मोर, पितळी दरवाजा, घाटी दरवाजा, निंबाळकर दरवाजा, जिथे- जिथे चांदी आहे ते सर्व भाग स्वच्छ  चकचकीत करुन दिले आहै. 

श्री तुळजाभवानी मंदीर गाभाऱ्यात व्हेटीलेशन नसल्याने चांदी काळसर पडते या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता केली जाते.कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी ही आमच्या घराण्याची कुलदैवता असुन मी पुण्यात दागिने घडविण्याचे काम करतो देविची सेवा म्हणून मी सेवा गेली  सहा वर्षा पासुन करीत असुन   यासाठी मला माझ्या कामगारांनी व दोन मिञांनी सहकार्य केल्याचे सांगितले.

 
Top