उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दोनवेळा सानुग्रह अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी रक्कम शासनजमा करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड- १९ संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील नातेवाईकांना महाराष्ट्र शासनाने ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला परंतु काही तांत्रिक बाबीमुळे व प्रस्ताव पाठवताना एक पेक्षा अधिक वेळा व जवळच्या नातेवाईकांनी पाठवल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील १८ व्यक्तींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ दोन वेळेस प्राप्त झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.

 त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचेकडून जनतेस आवाहन करण्यात येत आहे की ज्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यामध्ये एक पेक्षा अधिक वेळा सहानुग्रह अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे. अशा नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे संपर्क साधून सदरील रक्कम शासनाच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी  केले आहे. 

 
Top