नळदुर्ग  / प्रतिनिधी-

ओबीसींच्या ५० टक्केच्या आतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे या मागणीसाठी नळदुर्ग येथून मोठ्या संख्येने मराठा समाज कळंब येथील मोर्चाला जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

कळंब येथे दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा निघणार आहे, त्या पार्श्वभूमीवर (नळदुर्ग ता. तुळजापूर )येथे आंबाबाई मंदिरातील सभागृहात सकल मराठा परिवाराची बैठक आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीला तुळजापूरच्या धनाजी मुळे,  जाधव सर, मुळे सर, खोपडे सर हे मान्यवर उपस्थित होते, तर अनंत काटकर, प्रशांत मिटकर, विकास भोसले, माजी नगरसेवक शरद बागल, आभियांता स्वप्नील काळे,  दीपक काशीद, मुकुंद नरवडे, संजय दशरथ जाधव, दादा नागने आदीसह सकळ मराठा परिवारातील सदस्य उपस्थित होते, 

  या वेळी प्रशांत मिटकर, श्री जाधव, श्री मुळे, विनील जांभळे, दीपक काशीद, विकास भोसले यांनी ही मनोगत व्यक्त केले. या बैठकीस मुन्ना भोसले, बंटी मुळे, योगेश माने, आकाश काळे, बालाजी मोरे, युवराज जगताप, सुनिल चौधरी, गणेश शिंदे, रतिकांत नागणे, गणेश किल्लेदार, श्री मुरमे, श्री सातपुते, दत्ता पाटील यांच्यासह बहुसंख्य मराठा परिवार उपस्थित होता. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तानाजी जाधव यांनी केले तर आभार अनंत काटकर यांनी मानले.


 
Top