उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत शासनाच्या महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यीक आणि कलावंत यांना मानधन योजनेअंतर्गत पात्र वृध्द साहित्यिक आणि कलावंत यांचे 2017-2018 या वर्षातील मानधन मिळण्याबाबत निवड करण्यासाठी दि.19 आणि 20 जुलै 2022 तसेच 2018-2019 या वर्षातील मानधन मिळण्याबाबत निवड करण्यासाठी दि. 14 आणि 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पात्र साहित्यिक आणि कलावंताची अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्याची कार्यवाही चालू आहे.

  तरी मुलाखती दिलेल्या वृध्द साहित्यीक आणि कलावंतांना आवाहन करण्यात येते की, सर्व निवड प्रक्रिया ही नियमानुसार आणि आपण दिलेल्या मुलाखतीनुसार होणार असल्याने कोणत्याही व्यक्तीने आपली निवड करतो म्हणून आमीष दाखविल्यास कोणत्याही व्यक्तीच्या अमिषास बळी पडू नये,  असे जिल्हास्तरीय मान्यवर वृध्द साहित्यीक आणि कलावंत मानधन निवड समितीचे अध्यक्ष व सदस्य सचिव तथा जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.


 
Top