लोहारा/प्रतिनिधी

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजने अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत राबवत आहेत.लोहारा गग्रामीण रुग्णालय अंतर्गत.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग दुरीकरण काम सुरु आहे.या उपक्रमाला साथ देण्यासाठी गणेशोत्सव निमित्ताने लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेशोत्सव मंडळ व श्री महात्मा बसवेश्वर गणेश मंडळ यांनी सामाजिक भावना जपत ग्रामीण रुग्णालय लोहारा यांच्या अंतर्गत उपचार घेत आसलेल्या टिबीच्या क्षयरोगाच्या दोन रुग्णांस पुढील एक वर्षासाठी पोषण आहारासाठी दत्तक घेतले आहे.

 या मंडळाच्यावतीने त्यांना योग्य तो पोषण आहार दिला जाणार आहे.  हा उपक्रम लोहारा तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गोविंद साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी क्षय रोग पर्यवेक्षक ज्ञानेश्वर बिराजदार, नागेश ढगे, औषध निर्माता खंडु शिंदे, दत्ता बोर्डे, किंग कोब्रा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ईश्वर बिराजदार, ओम पाटील, देवा महाजन, गोपाळ सुतार, दत्ता निर्मळे, गगन‌ माळवदकर, प्रशांत जटटे, ब्रह्मानंद माळी, परमेश्वर मुळे, श्री महात्मा बस बसवेश्वर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष वैजीनाथ माणीकशेट्टी, उपाध्यक्ष संतोष फावडे, सचिव रामेश्वर वैरागकर, शशांक पाटील, प्रसाद जट्टे, दयानंद स्वामी, धनराज फरीदाबादकर, रवी नरुणे, गणेश हिप्परगेकर, विरेश स्वामी, योगेश स्वामी, आपु स्वामी, विरभद्र फावडे, विजय स्वामी, सचिन स्वामी, वैभव माणीकशेट्टी, सुमित फावडे, सागर स्वामी, राजेंद्र स्वामी, पापु बोराळे, प्रविण संगशेट्टी, प्रशांत माळवदकर, बाळू माशाळकर आदी उपस्थित होते. 

 
Top