लोहारा/प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची तात्काळ चौकशी करुन सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांना दिले आहे. 

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, उमरगा,लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, माजी नगरसेवक खलिफा कुरेशी, उमरगा युवक अध्यक्ष शमशोददीन जमादार, इम्रान फकिर  उपस्थित होते.

 
Top