उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबाच्या पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून गेल्या एक महिन्यापासून मानसिक त्रास देणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच हिंगोली जिल्ह्यातील घोटा (देवी) तुळजाभवानी संस्थानातील पुजारी गजानन किसन जगताप (गुरव) यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या त्रासाच्या जासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोन्ही प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, अखिल गुरव समाज संघटना व गुरव समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२३ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले.

  अणदूरच्या गुरव समाजाची नाहक बदनामी करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. या मंदिरात दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी मंदिरात कायमस्वरूपी किमान ४ पोलिसांची नेमणूक करावी. तसेच दर रविवारी काढण्यात येणाऱ्या छबिना मिरवणुकीच्या वेळी किमान १० पोलिसांचा बंदोबस्त देण्यात यावा देवस्थान व गुरव समाजाची शेती पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी व पुजार्यांना मंदिरातून हाकलून लावण्याचे प्रयत्न करणाऱ्या विरोध कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

 यावेळी अखिल गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड.प्रशांत खंडाळकर, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, सचिन धारूरकर, युवा अध्यक्ष अजित मोकाशे, प्रदेश उपाध्यक्ष गोपाळ नळेगावकर तसेच सुदर्शन मोकाशे, वैभव मोकाशे, शुभम मोकाशे, शुभम मोकाशे, मार्तंड मोकाशे, राम मोकाशे, संकेत मोकाशे, चंद्रकांत ढेपे,‌ बाळासाहेब स्वामी, , नागनाथ बोरगावे, विजय कारभारी, रामभाऊ मोटे, युवराज नळे, अभिजीत मोकाशे, प्रकाश मोकाशे, नरसिंग मोकाशे, आकाश मोकाशे, रोहित मोकाशे, संतोष मोकाशे, रत्नाकर मोकाशे, नवनाथ मोकाशे, नवनाथ मोकाशे, दिनेश मोकाशे, विवेक मोकाशे, मल्हार मोकाशे पुरुषोत्तम ढेपे, सुरेश मोकाशे, प्रशांत मोकाशे, नागनाथ मोकाशे, संतोष मोकाशे, विजय मोकाशे, माऊली मोकाशे, महेश येळकोटे, प्रशांत मोकाशे, रावसाहेब मोकाशे, प्रवीण मोकाशे, हरि मोकाशे, रविकांत मोकाशे आदीसह गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

 
Top