तेर/  प्रतिनिधी 

 मराठवाडा सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने  मराठवाडा मुक्तीसग्राम दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील व्यक्तींना  राज्यस्तरीय मराठवाडा  रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये मराठवाडा उद्योगरत्न म्हणून नायगाव येथील आदिनाथ गोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.  

पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परीषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध संगितकार रविंद्र घांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व  प्रसिद्ध संगितकार पंडित सुहास व्यास तसेच  संजय आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नायगांव येथील आदिनाथ गोरे यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत हिटजेन कम्बशन प्रा.लि.,फोरमॅक्स लि इन्टॅक्ट अप्लायन्सेस प्रा.लि. या कपंनीचे संचालक म्हणुन कार्य करत आहेत.

या कार्याबरोबरच ते आपल्या जन्मभुमीसी आजुनही नाळ जोडून आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल आदिनाथ गोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .


 
Top