परंडा / प्रतिनिधी - 

तालुक्यालीत भोंजा हवेली ग्रामपंचायत येथे पशुसंवर्धन विभाग सोनारी कार्यक्षेत्र चे पशुधन विकास अधिकारी ऋषिकेश जगदाळे यांनी लम्पी आजारा संदर्भात शेतकऱ्यांना गाई, म्हैस, बैल,शेळ्या, पाळीव प्राण्यांची सध्या काळजी घ्यावी असे आवाहन केले तसेच मागील पंधरवड्यापासून लम्पी आजाराचे थैमान असताना देखील लम्पी आजार रोखण्यासाठी पशुधन विकास अधिकारी जगदाळे यांनी १२ गावातील गाई म्हैस बैल शेळ्या मेंढ्या इत्यादी जनावरांना मोफत लस देऊन उर्वरित वंचित लाभार्थी यांच्या पशुनां ही लस घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी गोठ्याची साफसफाई व्यवस्थित करून घ्यावी गोठ्यामध्ये गोचीड राहण्याचे प्रमाण जास्त असते हे दुर करण्यासाठी फवारणी करुन गोठा स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी अशी माहिती जगदाळे यांनी दिली आहे. 

यावेळी ग्रामसेवक मनोज काशीद, सरपंच समाधान कोळी, उपसरपंच शिवाजी घाडगे, लघुउद्योग सल्लागार/ संचालक गणेश नेटके, बागायतदार सागर भांदुर्गे, प्रप्फूल मोरे, पै.उमाजी भांदुर्गे, सर्जेराव मोरे, उद्योजक शरद कोळी, बागायतदार बीरमल कोंडलकर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला.


 
Top