उस्मानाबाद/ प्रतिनिधी

  18  वर्षावरील सर्व महिला,माता ,व गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी दिनांक 26/09/2022 पासून नवरात्री उत्सवात 18 वर्षावरील सर्व महिलांच्या आरोग्य तापसणीबाबतचा “माता सुरक्षित तर घर सुरक्षित”हे अभियान चे शुभारंभ आज स्त्री रूग्णालय उस्मानाबाद मध्ये जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा मा.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.अर्चनाताईंनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या जि.प. आरोग्य सभापती असताना जननी सखी योजना चालु केली त्याची माहिती दिली. तसेच महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगुन ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

  या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित महिलांना मा.अर्चनाताईंच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका मा. प्रेमाताई पाटील, स्त्री रूग्णालय उस्मानाबादच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे, गवळी मॅडम, डॉ.लाकाळ सर, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादचे डॉ.स्वामी मॅडम, डॉ.गरड मॅडम डॉ.सुनील चव्हाण सर, डॉ.सोनाली पाटील मॅडम, डॉ.रेखा टिके मॅडम, रुग्णालयातील सर्व रुग्ण रुग्णांचे नातेवाईक व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top