तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर खुर्द भागातील जय शिवाजी तरुण मंडळ व महात्मा फुले युवा मंच वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत  गणेशोत्सव साजरा करीत असुन मंगळवार दि.६रोजी गणेशोत्सव निमित्ताने हजारो लोकांना अन्नदान केले.

या अन्नदान उपक्रमाचे  उद्घाटन व मंडळाच्या गणेश मुर्तीचे पुजन  आरती  उस्मानाबाद जिल्हा पञकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम व तालुका पञकार संघाचे सचिव कुमार आबा नाईकवाडी यांच्या हस्ते झाले. त्या नंतर अन्नदान महाप्रसाद कार्यक्रम आरंभ झाला याचा हजारो गणेश भक्तांनी लाभ घेतला 

या पुर्वी मंडळाने घेतलेल्या रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

या उपक्रमाचा यशस्वीते साठी  ,मंडळाचे आधारस्तंभ रामेश्वरअप्पा नन्नवरे, शरद जगदाळे, गणेश  नन्नवरे 

मंडळाचे अध्यक्ष अनिकेत भोजणे, उपाध्यक्ष अजय गायकवाड, सचिव आविष्कार भोजने, चैतन्य क्षीरसागर, चंद्रसेन भोजने, सोमनाथ भोजने, बालाजी जाधव, आशिष लोले, शुभम जाधव, विजय नन्नवरे, ज्योतीराम जाधव, मनोज खारे, अभिजित भोजने, विश्वास भोजने, सूरज लोले आदींनी घेतले. 

 
Top