उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यातील तलमोड येथील एकाने भांडणाचा राग मनात ठेवून संगनमताने उमरगा येथे झोपायला जायच्या बहाण्याने सोबत नेऊन हंटर, कत्तीने मारहाण करून चुलत भावाचा खून केल्याची घटना   तालुक्यातील तलमोड येथे घडली आहे.पोलिसांनी प्रमुख दोन आरोपीसह तीन अल्पवयीन आरोपींना सहा तासांच्या आत ताब्यात घेतले.

 पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तलमोड येथील दीपक नामदेव मंडले वय 19  व सुनील मंडले वय 20 या चुलत भावात बुधवारी मध्यरात्री उशिरा काही कारणास्तव भांडण झाले.यावेळी सोबत असलेल्या सागर कुंडलिक माने वय 19 व इतर तीन अल्पवयीन मुलांनी याने भांडण सोडविले.यावेळी सुनील मंडले,सागर कुंडलिक माने व इतर तीन अल्पवयीन मुलांनी संगनमताने दीपक मंडले यास उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये झोपायच्या बहाण्याने घेऊन आले.चुलत भाऊ असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून दीपक हा उमरगा येथे त्यांच्यासोबत  आला.यावेळी बुधवारी पहाटेच्या सुमारास भांडणाचा राग मनात ठेवून सुनील मंडले,सागर माने व इतर तीन अल्पवयीन दीपक मंडले यास हंटर, कत्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली यात जबर मारहाण झाल्याने दीपक मंडले हा जागीच ठार झाला.यावेळी आरोपींनी दिपकच्या मृतदेह खोलीतील चटई मध्ये गुंडाळून परत तलमोड ला दुचाकीवर घेऊन गेले व गावा नजीकच्या एका शेतात फेकून दिले.पहाटे सहा च्या दरम्यान काही जणांना हा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी याची खबर पोलिसांना दिली यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,पोलीस निरीक्षक मनोज राठोड हे पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना झाले.घटनास्थळी जावून मयताची माहिती घेत असताना हा मृतदेह तळमोड येथील दीपक मंडले याचा असल्याचे निष्पन्न झाले तसेच मृतदेह गुंडाळलेली चटई उमरगा येथे उपजिल्हा रुग्णालयाक्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये दिसून येतात अशी माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी जावून पाहणी केली.तेथील पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताचे डाग,मारहाणीत वापरलेले हत्यार आढळून आले.तेथीलच काही प्रत्यक्षदर्शींनी काय घडले याची माहिती सांगितल्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत या घटनेतील सागर माने व तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले तर प्रमुख आरोपी सुनील मंडले हा फरार झाला होता त्याचा माग घेतला असता तो सोलापूर येथे असल्याचे माहिती मिळाल्यावर त्यास सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले.अवघ्या सहा तासांच्या आत सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 
Top