उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डाॅ व्ही. के. पाटील शैक्षणिक संकुलामधील एस. पी. पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, अभियंता मोहन कुलकर्णी,अभियंता  दशरथ धुमाळ,अभियंता अमित राजगुरू,अभियंता यहिया काझी,डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरज नन्नवरे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमर कवडे, विभाग प्रमुख सुबोध कांबळे यांच्या हस्ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

 यावेळी डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले, चांगले अभियंते ही काळाची गरज आहे.भविष्यात अभियंता या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संधी असून विद्यार्थ्यांनी या संधीच सोनं केलं पाहिजे.या कामे आपलं पॉलिटेक्निक कॉलेज देखील मागे पडणार नाही याची दक्षता सर्व कर्मचारी वर्गाने घ्यावी असे आवाहनही यावेळी केले.

 यावेळी अभियंता मोहन कुलकर्णी,अभियंता दशरथ धुमाळ,अभियंता अमित राजगुरू,अभियंता यहिया काझी यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील पॉलिटिकल कॉलेज  हे विद्यार्थ्यांना भविष्य व करिअर घडवण्याची चांगली संधी निर्माण करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.एस.पी.पॉलिटेक्निक कॉलेजने भविष्यात शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारून चांगले अभियंते घडावावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी प्रीतम जाधव व अविनाश काळे या विद्यार्थ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.   तसेच महाविद्यालयातील मागील परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व नवीन विद्यार्थ्यांचे सत्कार व‌ स्वागत सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख उंबरे ए.ए,पाटील डी.ए, गुंड पी.बी,पडवळ डी.एस, प्राध्यापक सय्यद एस.एन,गव्हाणे एस.बी, बाराते आर.बी,पडवळ पी.डी, सोनवणे एस.एस,आदमीले ए.एस, शेख मॅडम,चौगुले मॅडम,डोंगरे मॅडम, साखरे मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.


 
Top