उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 गर्भवती स्त्रीयांची अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या गुलबर्गा (कर्नाटक) येथील बोगस  डॉक्टरास उस्मानाबाद पी.सी.पी.एन.डी.टी च्या पथकाने कर्नाटक पोलीस व आरोग्य विभागाच्या  मदतीने मोठ्या धाडसाने कार्यवाही करत  या रेकेटचा पर्दाफाश केला असून या कार्यवाहीत अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या गुलबर्गा कर्नाटकातील डॉक्टरास पोलिसांनी  अटक केली आहे तर एजेंट मात्र फरार झाला आहे.

 मुलीचा जन्म दर मुलापेक्षा कमी होत आहे यामुळे महाराष्ट्र शासन राज्यभर मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर पी.सी.पी.एन.डी.टी सेल सतत प्रयत्न करत आहे. दि ०६ सप्टेंबर २०२२ रोजी अतिरिक्त संचालक ( कुटुंब कल्याण) पुणे यांच्याकडून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील गर्भवती स्त्रीयांची अवैधरित्या गर्भलिंग निदान गुलबर्गा येथे आळंद  (कर्नाटक ) येथील एजंट मार्फत घेऊन जात आहेत. व  तेथे अवैधरित्या गर्भलिंग निदान केंद्र चालवणारे डॉक्टर गुरुराज कुलकर्णी यांच्या मार्फत गर्भलिंग  निदान चाचणी करण्यात येत असल्याचे  चौकशीमध्ये निष्पन्न झाले.

  या गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टर व त्याच्या टोळीचा पर्दाफास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी केलेल्या आवाहनानुसार  जिल्हा दक्षता समिती (पी.सी.पी.एन.डी.टी ) चे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन बोडके, नोडल अधिकारी डॉ दत्तात्रय खुणे यांच्या  मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद पी.सी.पी.एन.डी.टी सेलच्या विधी सल्लागार अॅड रेणुका शेटे आणि उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचे  वैद्यकिय अधीक्षक  डॉ. विक्रम आळगीकर व त्यांची टीम यांनी गुलबर्गा येथे जाऊन तेथील आरोग्य विभागाचे पी.सी.पी.एन.डी.टी चे जिल्हा समुचीत प्राधिकारी  व पोलीस प्रशासनाची मदत घेवून दोघांच्या समन्वयाने  उमरगा येथून गुलबर्गा येथे सोबत नेलेल्या  बनावट रुग्ण  (डमी पेसेंट) ची  अवैधरीत्या गर्भलिंग निदान करताना डॉ गुरुराज कुलकर्णी  यांना रंगेहात पकडले तसेच त्यांचेकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व सोनोग्राफीसाठी लागणारे इतर आवश्यक साहित्य हस्तगत केले आहे. डॉ गुरुराज कुलकर्णी यांना ब्रम्हपुर गुलबर्गा (कर्नाटक ) पोलिसांनी  तात्काळ ताब्यात घेतले आहे मात्र  आळंद येथील त्यांचा साथीदार एजंट हा फरार झाला आहे.महाराष्ट्रातून कर्नाटकात जावून अवघड असलेली हि धाडसी कार्यवाही यशस्वी करण्यासाठी (पी.सी.पी.एन.डी.टी ) च्या उस्मानाबाद सेल ला मोठे  यश आले आहे.

 सर्व जनतेस विशेषतः सीमावर्ती भागातील जनतेस अवाहन  करण्यात येते कि कोणी गर्भलिंग निदान करत असेल , अथवा गर्भलिंग निदान करण्यासाठी  घेवून कोणीही जात असेल अथवा गर्भलिंग निदान आपल्या भागात चालू असल्याची माहिती मिळाल्यास  www.amchimulgi.gov.in या वेबसाईट  वर तक्रार नोंदवा  अथवा येथील जिल्हा रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा. असे अवाहन जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ डी.के.पाटील यांनी केले आहे.


 
Top