उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी म्हणून वर्धा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्याचे प्रधान सचिव डॉ राजगोपाल देवरा यांनी याबाबतचे बदलीचे आदेश काढले आहेत. कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली करण्यात आली असून डॉ सचिन ओंबासे हे नवे जिल्हाधिकारी असतील.  दिवेगावकर यांची प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामविकास प्रकल्प पुणे या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी दिवेगावकर हे ऐन नवरात्रात आजपासूनच सुट्टीवर गेले होते त्यातच त्यांच्या बदलीचे आदेश धडकले.

डॉ ओंबासे हे 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज येथून ते एमबीबीएस झाले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळावा म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केलेली सूचना महिला व बाल विकास मंत्रालयाने अंमलात आणत ती राज्यभर राबविली आहे.


 
Top