उमरगा / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नुकसान भरपाई मध्ये समावेश करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिल्या मुळे शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी   शनिवारी आपले अमरण उपोषण  मागे घेतले .

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विभागीय कार्यालयाने नुकसान भरपाईचा समावेश करण्यात आला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याना हेक्टरी पंचेवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या एकमेव मागणी साठी शेतकरी नेते विनायकराव पाटील हे  कवठा सेवा ग्राम येथे ३१ ऑगष्ट पासून आत्मक्लेश -अमरण उमोषणास बसले होते. त्यांच्या उपोषणाला विविध राजकिय पक्षांचा , शेतकऱ्यांचा व सामाजिक संस्थांचा वाढता पाठींबा मिळाला होता. उपोषण कालावधि दरम्यान पाटील यांची प्रकृति खालावली होती.

आज शनिवारी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मध्यस्थी करून दसऱ्याच्या अगोदर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली . संपुर्ण जिल्हयातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाने व शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दसरा सणाच्या आत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा सरकारचा दसरा मेळावा होऊ देणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया विनायकराव पाटील यांनी या वेळी व्यक्त केल्या . उपस्थित बालकाच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले .

प्राचार्य डॉ. दिलीप गरूड , प्रभारी तहशिलदार रतन काजळे , विजयकुमार सोनवणे , नानाराव सोनवणे , व्यकंट सोनवणे , मनसेचे शाहुराज माने , संभाजी ब्रिगेडचे कार्यकरते , माजी सरपंच गणेश पाटील सह कवठा ग्रामस्थ , शेतकरी मोठया संख्येनि उपस्थित होते .

 
Top