उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी संस्थेचा विस्तार करीत असताना त्यांना पूर्णपणे साथ देण्याचे काम त्यांच्या धर्मपत्नी म्हणजेच आपल्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी अफाट कष्ट करून बापूजींना मोलाची साथ दिली ते आपण कदापि गुरुदेव कार्यकर्ते विसरू शकत नाही, असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात  ”संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे जयंतीनिमित्त”मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.

प्रारंभी त्यांनी संस्थामाता यांचे पुतळ्याचे व प्रतिमेचे पुजन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.स्वाती बैनवाड,श्रीमती भाग्यश्री गोंदकर,प्रा.बाबर मॅडम,डोळे मॅडम,प्रा.जाधव मॅडम,उपस्थित होते.

 यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते.


 
Top