उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद या कार्यालयाचे मीडिया कक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे 17 सप्टेंबर 2022 पासून कार्यान्वित आहे. या कक्षामार्फत श्री तुळजाभवानी देवीजींच्या धार्मिक कार्यक्रमांच्या वृत्त, छायाचित्र आणि व्हिडिओ जिल्ह्यातील वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ई-मेल आणि व्हॉटस्अप द्वारे पाठविण्यात येतात. तसेच जिल्ह्यातील पत्रकार आणि प्रसार माध्यमातील प्रतिनिधींच्या सुरक्षा पासेसही या कक्षामार्फत दिले जातात. या कक्षास लातूर विभागाच्या उपसंचालक(माहिती) डॉ.सुरेखा मुळे यांनी भेट देऊन येथील कामकाजाबाबत माहिती घेतली. तसेच या मीडिया कक्षाच्या कामाबाबत आणि नियोजनाबाबत कौतुक केले.

 तत्पूर्वी डॉ.मुळे यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार प्रशासन योगिता कोल्हे यांनी डॉ.मुळे यांचे स्वागत केले. तसेच जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनीही यावेळी उपसंचालक डॉ.मुळे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक यासेरोद्दीन काझी, मीडिया कक्षातील समन्वयक भिमा पडवळ, मोहन कोळी, सिध्देश्वर कोंपले, श्रीकांत देशमुख आणि अनिल वाघमारे आदीं उपस्थित होते.


 
Top