उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष उपाध्यक्ष  राजाभाऊ मुंडे यांचा वीरशैव जंगम मठ  च्या वतीने 68 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्तविक वीरशैव जंगम मठ ट्रस्ट अध्यक्ष शिवानंद कथले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   नगरसेविका सौ. प्रेमाताई पाटिल होत्या.प्रमूख पाहुणे म्हणुन सुप्रसिद्ध हदय रोग तज्ञ व काँग्रेस पक्षाच्या   महीला प्रदेश उपाध्यक्षा डॉ . स्मिता शहापूरकर   , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  हनुमंत भुसारे, अमोल पेठे होतें.

यावेळी  डॉ. शहापूरकर मॅडम यांनी बार बार ये दिन आये. तुम जियो हजारो साल. हॅपी बर्थडे टू यू राजाभाऊ मुंडे आबा.  हे आपल्या  सुमधुर आवाजात गाणे म्हणून उपस्थित महिला मंडळ व उपस्थित पाहुण्यांना  सहभागी करून घेवून  घेतले. व सर्व उपस्थित महीलाचा व सर्वाचा उत्साह वाढवून लक्ष वेधून घेवून सर्व उपस्थित लोकाची मने जिंकली. व आत्मिक समाधान आणि आरोग्यविषयक  विषया वर मार्गदर्शन केले. हनुमंत भुसारे यांनी आदर्श पतसंस्थेचे वतीने वाढदिवसाच्या  शुभेछ्या देवुन सर्व संचालक व कर्मचारी  च्या उपस्थीती मध्ये सत्कार करून करून शुभेछ्या दिल्या.  वीरशैव लिंगायत महिला मंडळ यांच्या वतीने  शाल हार,पुष्पगुच्छ, देवुन महिला मंडळ यांनी सत्कार केला व महिला मंडळ यांच्या वतीने शकुंतला लगदिवे यांनी शुभेछ्या दिल्या. वीरशैव जंगम मठ ट्रस्ट च्या वतीने 68 व्या वाढदिवसानिमित्त  केक कापून मानाचा  फेटा, शाल व 68 किलोचा गुलाबाचा पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. 

अध्यक्षीय भाषणात सौ.प्रेमाताई पाटिल यांनी आदर्श शिक्षण संस्थेच्या वतीने शुभेछ्या देवून  महिला च्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील  राहणार असल्याचे व महिला मंडळ यांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद च्या वतीने महिला मंडळ यांना  मुंडे आबा यांच्या वाढदिवसानिमित्त 168 साड्याचे वाटप करण्यात आले. सत्कारमूर्ती राजेंद्र मुंडे आबा नी सर्वाचे आभार व्यक्त करून  समाजाच्या  व ट्रस्ट च्या विविध  प्रश्नासाठी सतत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले व वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श पतसंस्थेचे तज्ञ संचालक त्रिंबक कपाळे व आभार प्रदर्शन ट्रस्ट चे कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे  यांनी केले. यावेळी वीरशैव लिंगायत महिला मंडळसह  बहु संख्याने लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.


 
Top