तुळजापूर / प्रतिनिधी-

  उस्मानाबाद  जिल्ह्यातील तुळजापूर  बाजार समितीने राज्यातील ३०५ बाजार समित्यां रँकिंग मध्ये  राज्यात ३४वा.  लातूर   विभागात ५वा.  जिल्हयात पहिला  क्रमांक पटकावला आहे. .  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट ) प्रकल्पांतर्गत २०२१-२२ च्या कामगिरीच्या आधारावर ही वार्षिक क्रमवारी जाहीर केली गेली आहे.

बाजार समित्यांची रॅकिंग निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधेनुसार ३५ निकष आणि २०० गुणांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती  लहान बाजार समिती आहे. या बाजार समितीत सर्वकामकाज आँनलाईन चालते शेतकऱ्यांना येथे चांगला भाव मिळत आहे.सोलापूर  व लातुर या मोठ्या बाजार समित्यांच्या मध्ये असुन ही येथे या मोठ्या बाजार समित्यांना टक्कर देत आहे.   


 
Top