तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या श्रमनिद्रा विधीसाठी लागणारा पलंगाची बांधणी  जोडणीचे कार्य मंगळवार दि.30 रोजी  संपन्न झाले.देविजींचा श्रमनिद्रेसाठी लागणारा पलंग तयार करण्याचा मान यादव काळापासुन पलंग नगरचे तेली पलंगवाले घराण्याकडे असुन हे घराणे आजही ही परंपरा श्रध्दापुर्वक जपत आहेत.

श्रमनिद्रा साठी तयार करण्यात येणारा पलंगासाठी साग व आंबा लाकुड लागते यासाठी लाकुड लोखंडी खिळे पट्या सह अन्य साहित्य पुर्वी घोडेगावला राहणारे पण आता पुण्यात स्थायिक झालेले ठाकुराकडे दिले जाते व हे पलंग जोडणी काम घोडेगाव येथील भागवत सुतार  करतात नंतर घोडेगाव हुन हा पलंग राजमाता माँ जिजाऊ दर्शनासाठी जुन्नर नेण्याची परंपरा असुन तिथे त्याचे पुजन केले जाते.

श्रीतुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रा साठी तयार केलेला पलंग नवमी दिनी तिर्थक्षेञ तुळजापूर आणुन येथे दस-याचा देविंजींचा सिमोल्लंघन सोहळा संपताच हा पलंग सिंह गाभाऱ्यात ठेवुन त्यावर श्रीतुळजाभवानी मुळमुख्य मुर्ती निद्रीस्त केली जाते ही मुर्ती पलंगावरुन अश्विनी पौर्णिमा दिनी देविजींचा मुख्यगृर्भ गृहात सिंहासनावर प्रतिष्ठापित केली जाते.श्रमनिद्रा विधी  लागणारा पलंग तयार करण्याची परंपरा आज गणेश पलंगे,उमेश पलंगे,अनंत पलंगे,प्रफुल्ल पलंगे,प्रथमेश पलंगे नगरचे तेली-पलंगवाले राहणार अहमदनगर पाळत आहे.


 
Top