तेर / प्रतिनिधी-

 श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी व कर्मवीर हिंदी अध्यापन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तेर (ता. उस्मानाबाद) येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थिनींनी कुमारी माजिया जुनेद मोमीन हिने माध्यमिक गटात चौथा क्रमांक पटकाऊन उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.      

यावेळी माजिया मोमीन हिला हिंदी विषयाचे शिक्षक ए. बी. वाघेरे व एल टी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी मुख्याध्यापक जे. के. बेदरे यांच्या हस्ते मोमीन हिचा रोख पारितोषिक मानपत्र व शैक्षणिक पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एस .एस. बळवंतराव  , एम. एन. शितोळे  , महादेव भंडारे , एस. यु .गोडगे , एस. टी. कोळी , एस. टी .गांगुर्डे , एम. एल. कांबळे , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , प्रा सुर्यकांत खटिंग सतिश भालेराव , एस .आर .पाटील शितल सामते , एम. एन .रणदिवे , एस. बी. पाटील , एस. डी .घाडगे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 


 
Top