तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापुर तालुक्यातील मंगरूळ येथील मुस्लिम स्मशानभूमी संरक्षण भिंतीच्या कामासाठी चार लक्ष रुपये  निधी प्राप्त झाला असून त्या कामाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषद मा. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या प्रयत्नांमुळे व मा.उपसभापती चित्तरंजन सरडे यांच्या पाठपुराव्याने मंगरूळ येथील मुस्लिम स्मशानभूमी संरक्षण भिंतीसाठी चार लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून या कामाचे  उद्घाटन  गावातील प्रतिष्ठित नागरिक व  मुस्लिम समाजाच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी   चित्तरंजन सरडे, सत्तार मुलाणी,   गिरीश   डोंगरे , महेश   डोंगरे ,   प्रतापसिंह सरडे ,   गोविंद डोंगरे , आप्पा जेटीथोर , आदम फकीर , राहुल साठे , मकरंद लबडे यांच्यासह  गावातील मुस्लिम बांधव व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top