उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षक दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस असून तो संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

 याप्रसंगी सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top