लोहारा/प्रतिनिधी

लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल सलंग्न नेताजी सुभाषचंद्र बोस क. महाविद्यालयात दि.5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिन सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील मँडम होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.विद्याधर बुवा, बालाजी जाधव, श्रीमती पोर्णिमा घोडके मँडम,प्रा.सुनील बहिरे,प्रा.प्रशांत काळे बालाजी इरुदे हे होते. सर्वप्रथम मा.राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्यानंतर इयत्ता 10 वी. व 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळा व कनिष्ट महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचा फुलांचे गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या वतीने आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला.कोरोना काळातील राहिलेले पुरस्कार सुध्दा या वेळी देण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे ; 

दत्ता जावळे पाटील, (2019-20); संजय विश्वंभरराव जगताप (2020-21); प्रा.विठ्ठल लिंबारी कुन्हाळे (2021-22); प्रा.ज्ञानदेव विठ्ठल शिंदे (2022-23), या सर्व आदर्श शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.    

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन शिंदे व सुत्रसंचालन इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांनी कु. वैभवी नंदकुमार डावखरे, कु. वैष्णवी लक्षण चव्हाण यांनी केले तर आभार धनराज धनवडे यांनी मानले.यावेळी शाळा व महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top