तुळजापूर/ प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूरसह तालुक्यात   दुर्गाष्टमी  दिनी रविवार दि.४ रोजी सांयकाळी माहेरवाशीण असलेल्या महालक्ष्मीगौरीचे पारंपरिक पध्दतीने १४ भाज्या व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवुन सहकुंटुंब आरती करण्यात येवुन महालक्ष्मीगौरी सण पारंपरिक पध्दतीने साजरा केला .

दुर्गाष्टमी जेष्ठागौरी पूजन महालक्ष्मी सणानिमित्त आई जगदंबा मातेस शिवकालीन ( छत्रपती श्री शिवाजी महाराज) यांनी देवीस दिलेले सुवर्ण अलंकार घालण्यात आले  होते.  गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतीक आहे , असे मानले जाते. तेज , समृद्धी आणि मांगल्याचे असणाऱ्या महालक्ष्मीगौरी सण पार्श्वभूमीवर   सर्वत्र भक्ति मंगलमय  वातावरण होते.

 
Top