तेर  / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद लुक्यातील तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत पोषण अभियानांतर्गत तेर येथील अंगणवाडीतील कार्यकर्ती ,मदतनीससह बालक मातांच्या उपस्थितीत अंगणवाडी क्रमांक १ च्या वतीने पोषण आहार अभियानांतर्गत गावांत जनजागृती रॅली काढण्यात आली 

 तेर ता .उस्मानाबाद येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत दिनांक १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण आहार अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसारच गुरूवार दिनांक १ सप्टेंबर रोजी पोलिस चौकी जवळील अंगणवाडी क्रमांक १४ मधून या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तेर दूरक्षेत्रचे  बीट अमंलदार प्रकाश राठोड , हरी खोटे , सुमेध वाघमारे , बापू नाईकवाडी , सुभाष कुलकर्णी  ,  इर्शाद मुलांनी , आशा स्वयंसेविका दैवशाला भोरे आदि उपस्थित होते. दरम्यान जनजागृती रॅलीत अंगणवाडीतील बालकांसह कार्यकर्ती व मदतनीस यांनी मटकी खा मोडाची वाढ होईल हाडांची , हिरवी भाजी पानाची निर्मिती करी रक्ताची , सही पोषण देश रोषण , जो खाईल पोषक आहार दूर पळतील सारे आजार , पपई लागते गोड गोड पचनशक्तीला नाही तोड , सकाळचा नाश्ता करावा मस्त मोड आलेले धान्य करावे फक्त , अमृततुल्य दूध मातेचे आरोग्य रक्षण करी बाळाचे , तिरंगी झेंडा भारताची शान पोषण आहाराला देऊ पहिला मान आदी घोषना देत गावांतून जनजागृती रॅली  काढण्यात आली .यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी पर्यवेक्षिका मनिषा पाटील यांनी  बालकांच्या पोषणविषयी व कुपोषण निर्मुलन संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी  अंगणवाडी सेविका अर्चना सोनवणे ,  प्रभावती वाघमारे , लिलावती लोमटे , एस.आय.शेख , रईसा बागवान ,सखूबाई राऊत , जोशीला लोमटे , दैवशाला ढवण , मिना बंडगर , रोहिणी कांबळे , अर्चना कोकरे , सरोजा वाघमारे , लतिका पेठे , मदतनीस अश्विनी खंदारे , महादेवी शिंदे , स्वाती कांबळे , काशीबाई रसाळ  , शेवंता सलगर , अश्विनी भक्ते , सरस्वती खंडागळे , सुशिला वगरे , मिरा खरात , सखूबाई पांढरे , पद्मिनी माने आदिंसह माता पालक उपस्थित होते.


 
Top