उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यामध्ये कार्यरत असणा-या गुणवंत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.त्याकरीता उस्मानाबाद जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू   (एक पुरुष व एक महिला) एक दिव्यांग खेळाडू, एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

  पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख दहा हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल, हे पुरस्कार फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खेळाडू, मार्गदर्शक यांनाच दिले जातील. पुरस्कार २६ जानेवारी, २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी वितरीत होणार या पुरस्काराबाबत अर्जाचा नमुना येथीलजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे दि. १५ ते ३० ऑगस्ट, २०२२ च्या दरम्यान विनामुल्य प्राप्त होतील. पुरस्कारासाठी परिपूर्ण अर्ज दि. ३० ऑगस्ट, २०२२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे सादर करावेत. विहीत मुदतीनंतर येणा-या अर्जांचा विचार पुरस्कारासाठी केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीकरीता कैलास लटके (क्रीडा अधिकारी) मो.क्र. ९९२३५३१४२३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 
Top