तुळजापूर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयात  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी  मंगळवार दि १६रोजी  तिर्थक्षेञ तुळजापूरात स्वाभिमानीशेतकरीसंघटना वतीने एस स्टँड समोर रस्ता रोको आंदोलन आयोजीत करण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांनी  व त्यांना मदत मिळवुन देण्यासाठी इतर घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानीशेतकरीसंघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केले. 

सदरील निवेदन  तहसिलदार मार्फत   जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी , कार्यालय यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्रइंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे, राजामामा भोसले, धनाजी हाके, संजय भोसले, नेताजी जमदाडे, प्रदीप जगदाळे,  स्वप्निल गायकवाड, शहाजी सोमवंशी आदी पदाधिकारींनी दिले आहे. 


 
Top