उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संसदेमध्ये विद्युत दुरुस्ती कायदा २०२२ दाखल करण्यात आला. हा कायदा पारित झाल्यास महावितरणचे खासगीकरण होणार आहे. या विरोधात सोमवारी उस्मानाबाद महावितरण मंडळ कार्यालय येथे संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा व निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकार व भाजप सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

शासनाकडून विद्युतचे खासगीकरणासाठी दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले आहे. यामुळे महावितरणचे खासगीकरण होऊन कर्मचाऱ्यांसह ग्राहकांचीही अडचण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या विरोधात कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावत आंदोलन केले. यावेळी कॉ. बी. एस. काळे, राज्य संयुक्त सचिव वर्कर्स फेडरेशनचे कॉ. परवेज पठाण, झोन सचिव शिरीष कुलकर्णी, वैभव मगर, एस. ई. ए. देवानंद सुरवसे, प्रशांत खंडागळे, विशाल कांबळे यांच्यासह कामगार विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top