उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला तात्काळ मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

 या निवेदनात राष्ट्रीय महामार्ग क्रं . 65 जुना ( 09 ) या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी उस्मानाबाद जिल्हयातील लोहारा व उमरगा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमीनी / जागा / बांधकाम असलेली घर व इतर मालमत्ता मागील 10 वर्षा पूर्वी संपादीत करण्यात आल्या आहेत . त्यावेळी मुळ जमीन मालकांना अल्प व तुटपुंजा मावेजा देण्यात आलेला होता . त्या विरोधात सर्व शेतकऱ्यांची व जागा मालकांनी लवादामध्ये वाढीव मावेजा मिळणेबाबत अपिल केले आहे . हे प्रकरण मागील 5 वर्षापासून मा . जिल्हाधिकारी कार्यालय , उस्मानाबाद येथे निर्णया अंती प्रलंबीत आहे व काही शेतकऱ्यांचे निर्णय देण्यात आलेले आहे . परंतू अद्याप पावेतो त्यांनाही मावेजा मिळालेला नाही अथवा वर्ग करण्यात आलेला नाही तरी विनंती की , मा . जिल्हाधिकारी साहेब , उस्मानाबाद यांनी नमुद संपादीत झालेल्या जमीनीच्या शेतकऱ्यांना लवादातून निकाल तात्काळ देवून संबंधीत शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळवून देण्यात यावा या मागणीसाठी जमीन संपादीत शेतकरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना , उमरगा व लोहारा यांच्या वतीने दि . 22/08/2022 रोजी मौजे दस्तापुर ता . लोहारा जि . उस्मानाबाद येथील महामार्ग क्रं . 65 च्या बाजूला बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यांची नोंद घेण्यात यावी . तसेच धरणे आंदोलन दरम्यान काही अनुचित राहील याची नोंद घ्यावी ही विनंती . प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.

 या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष शाहूराज लक्ष्मणराव माने व शेतकरी रत्नय्या गुरुसिध्द स्वामी , प्रभाकर गुणवंत मदने , फुलाबाई सोपान चव्हाण, छबुबाई प्रभाकर चव्हाण ,भारतबाई एकनाथ चव्हाण, शिवाजी बना सारणे ,प्रभाकर शंकरराव पाटील ,बालाजी यशवंत मदने ,राम पांडुरंग पाटील, माणिक पांडुरंग पाटील ,खंडू अर्जुन जाधव या संपादित जमिनी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत


 
Top