उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा शहरात अभूतपूर्व सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि.८) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. स्वातंत्र्यदिनी (दि.१५) शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, यामध्ये विविध शाळा, संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या वतीने सुमारे एक किलाेमीटरचा तिरंगा तयार करण्यात येणार असून, हजारो विद्यार्थी या तिरंग्याची यात्रा काढणार आहेत. या उत्सवाची जोरदार तयारी करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

शहरात विविध उपक्रम साजरे केले जाणार असून, नियोजनासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अामदार पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. शहरात स्वातंत्र्यदिनी भव्यशोभायात्रा काढली जाणार असून, यामध्ये शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यात विविध देखावे सादर केले जाणार आहेत.तसेच मर्दानी खेळ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे संचालन, विविध जाती-धर्माचे देखावे, पारंपरिक, महापुरूषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.बैठकीला प्रकाश जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, झेडपीचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, इलियाज पिरजादे, सुनील काकडे, अस्मिता कांबळे, राजाभाऊ पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, युवराज नळे, डॉ.चंद्रजीत जाधव, विष्णू इंगळे, अयाज शेख, बापू पवार, पांडुरंग लाटे, विशाल शिंगाडे, शिवानंद कथले, मनोगत शिनगारे, अॅड. नितीन भोसले, दत्ता पेठे, अमोल पेठे, राहुल काकडे, कैलास काकडे, संदीप इंगळे, उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, शिक्षणाधिकारी गजानन सुसार व मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोडभरले आदी उपस्थित होते.


 
Top