उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कार्य  ही साधना आहे. साधकांच्या हातून जे कार्य होईल ते भगवंताचे पूजन होईल.सन २०४४मध्ये भारत विश्ववंदिता होण्यासाठी ग्राहक प्रबोधना सह सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले..ते नाशिक येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय अभ्यास वर्गाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करीत होते.

   नाशिक येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात  राज्य अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकतीर्थ बिंदुमाधवजी जोशी यांच्या शिस्तबद्ध,सेवाभावी ग्राहक चळवळीच्या अभ्यास वर्गाला महाराष्ट्रातून २५ जिल्ह्यातून ३२५साधक उपस्थित होते. 

    पहिल्या दिवशी नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नर्सिंगकर यांच्या हस्ते अभ्यास वर्गाचे उद्घाटन झाले.या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांसाठी, उत्तम प्रबोधन, तन-मन-धनाने व समर्पित साधना नेहमीच  सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

उद्धाटनसञा नंतर राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी साधक कसा असावा? व राज्य सहसंघटक  सौ मेधाताई कुलकर्णी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- रचना  कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन  विभाग व जिल्हा आढाव्यासह उस्मानाबादचे शरद वडगांवकरांनी देशभक्ती  गीतमालांनी पहिल्या दिवसाच्या सञांची सांगता केली.    दुसऱ्या दिवशी सकाळी सौ मेघाताई कुलकर्णी यांचे चिंतन,गणेश परळीकर सहआयुक्त अन्न औषध प्रशासन यांनी दक्षता व प्रबोधन, प्रा  हेमंत वडणे (लातुर) यांनी माहितीचा अधिकारी व इतर लोकोपयोगी कायदे विषयक मार्गदर्शन केले.

      ग्रा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजित बागडे,जिल्हासंघटक शरद वडगांवकर, सहसंघटक डॉ.विशाल शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अशिष बाबर व पी के चव्हाण उपस्थित होते. पसायदानाने २ दिवसी य अभ्यासवर्गाची सांगता झाली .


 
Top