उमरगा / प्रतिनिधी-

देशातील विविध राज्यात जवळपास सहाशे विद्यापीठां अंतर्गत उच्च शिक्षण दिले जात आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीस ६४ वर्षाचा कालावधि पूर्ण झाला आहे . या विद्यापीठा मुळे मराठवाडयातील सर्व सामान्यांच्या घरा- घरा पर्यंत उच्च शिक्षण पोंहचण्याचे योगदान लाभले आहे. असे सांगून केंद्र शासनाच्या वतीने आता “ नवीन शैक्षणिक   धोरण २०२० “  बांधणी सुरू झाली आहे . या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक समानतेच्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.आगामी बदलत्या शैक्षणिक धोरणात  सर्व सामान्यांच्या मुलामुलींना गुणवत्तेचे शिक्षण मिळालेचं पाहिजे अशी आगृही भूमिका प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांनी मांडली ! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिना निमित्त आदर्श महाविद्यालयाच्या वतीने आयोजित चर्चा सत्रात अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. दिलीप गरूड बोलत होते. प्राचार्य डॉ. विजय सरपे , उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तावीक उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी केले . सुत्रसंचालन प्रा.डॉ. भीमाशंकर खरोसे यांनी केले. आभार प्रा.डॉ. राम सोलंकर यांनी मानले. कार्यक्रमा साठी प्राध्यापक ,विद्यार्थी , कर्मचारी मोठ्या संख्येनि उपस्थित होते.


 
Top