वाशी / प्रतिनिधी-  

महिलांनी कौटुंबिक हिंसाचाराला बळी न पडता कायद्याच्या मदतीने  अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे.यासाठी तालुका जिल्हास्तरावर महिला तक्रार निवारण केंद्र असून या ठिकाणी आपल्या व्यथा मांडून अन्यायाविरोधात लढा देऊन न्याय मिळवला पाहिजे,असे मत पोलीस उपनिरिक्षक किशोर काळे यांनी व्यक्त केले असून ते येथील छञपती शिवाजी महाराज चौकात जाणीव संघटना व वंचीत विकास संस्था पुणे यांच्या सयुंक्त विद्यमाने  आयोजीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मंगळवार (ता.नऊ) रोजी बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.विलास चाफेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुण अभिवादन करण्यात आले.

यावेळी विस्तार अधिकारी विशाल रणदिवे,जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे,कृषीधिकारी बी.ए.राठोड,माजी पोलीस पाटील हारुण काझी,बळीराम जगताप,वैशाली गायकवाड,गौतम मोरे,सुभाष गाडे,बप्पा खाडे,किरण लगाडे, ऋतिक क्षीरसागर ,नवनाथ शिंदे, भिकाजी गरड, बापू कदम, सीताबाई दळवे, सीमा यादव, सुखदेव गायकवाड ,भागवत काळे यांच्यासह जाणीव संघटनेच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांची उपस्थीती होती.

दुपारच्या सञात शिबिरात दिवंग्यासाठी शासनाच्या असलेल्या विविध योजना,महिला व बाल विकास,आरोग्य विभाग,कृषी,महिला उद्योग,विशेष घटक योजना आदी विभागातील योजनेविषयी उपस्थीत संबधीत अधिका-यांनी मार्गदर्शन केले.रामभाऊ लगाडे,हारुण काझी, सुभाष गाडे,बळीराम जगताप यांची भाषणे झाली.शिबिरासाठी २१ गावातील जवळपास संघटनेचे ६० कार्यकर्ते उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार  किरण लगाडे यांनी केले. 

 
Top