उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नुकसान झालेल्या शेतीपिकाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे  खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. 

 धाराशिव जिल्ह्यामध्ये मान्सुनचा पाऊस चांगला झाल्याकारणाने पावसाळा सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसुन येत होता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा कल नगदी पिक असलेल्या सोयाबीन हे पिक घेण्याकडे असल्याचे दिसून आले तदनंतर शेतकऱ्यांनी वेळेत शेतीच्या मशागतीची कामे करुन खरीपाची पेरणी पुर्ण केली परंतु जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 42 मंडळापैकी 11 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून खरीप हंगामातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीन, उडीद व मुग पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सततचा पाऊस व शंखी गोगलगाय, कीड अळींचा प्रादुर्भाव तसेच यलो मोझॅक या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवून सोयाबीन पिक हे पिवळे पडून शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. परंतु धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद असलेल्या 11 मंडळामध्येच पंचनामे सुरु असून उर्वरित 31 मंडळात तहसिल व कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचानामे करण्याचे आदेश नसल्याने पंचनामे झालेले नाहीत त्या अनुषंगाने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उर्वरित 31 मंडळामध्येही लवकरात लवकर पंचनामे करण्यासाठी संबंधितांना आदेशित करुन वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्यास मागणी केली.

 
Top